मालवण ता.०२-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांचाही पर्याय उपलब्ध होत असून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुरुवार म्हणजे ०२ जून पासून सुरू होत आहे. ती ३० जून पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-१९ च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजना मध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY पर्याय निवडावा अशी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येत आहे. Physical E-Scrutiny या पर्याय मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून ,प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह १.स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), २. संगणक (Computer) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -६०) , ३ विद्युत (Electrical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ४. अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ५. यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०) व ६. अन्न तंत्रज्ञान (Food Technology) (प्रवेश क्षमता -२०) या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्र(FC) यांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रिया समन्वयक म्हणून प्रा. दत्तप्रसाद गोलतकर काम पहात असून अधिक माहितीसाठी https://poly22. dtemaharashtra. gov.in/ या संकेतस्थळावर तसेच प्रा. डी. एन. गोलतकर- मोबा 9764513133, डॉ वाय.व्ही.महाडीक- मोबा 9423682846 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
