मालवण ता.०२-:* मालवण शहरातील कचरा, पाणी व स्ट्रीट लाईट संबंधित समस्यांच्या निवारणासाठी मालवण नगरपरिषदेने तक्रार निवारण कक्ष निर्माण केला असून या कक्षाच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर नागरिकांनी कचरा, पाणी व स्ट्रीट लाईट संदर्भातील तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.
मालवण शहरातील कचरा, पाणी व स्ट्रीट लाईट संबंधित समस्येची तक्रार ९४०५५७७४३१ या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावी. तक्रार नोंदविताना तक्रारदार नागरिकाने आपले नाव, तक्रारीचा तपशील, पत्ता व तक्रारी संबंधित फोटो पाठवायचा आहे. नोंदविलेल्या तक्रारींचे निवारण झाल्यानंतरचा फोटो देखील तक्रारदार नागरिकाने नगरपरिषदेसोबत शेअर करावा, असेही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी म्हटले आहे.
