शिक्षण विभागातील परिचर आप्पा बिलये यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

*⚡मालवण ता.०२-:* मालवण पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत असलेले परिचर श्री.आप्पा गोपाळ बिलये हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने तालुकास्कुल येथे आयोजित निरोप समारंभात शिक्षण विभाग मालवण तर्फे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या शुभहस्ते आप्पा बिलये यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच सर्वशिक्षा अभियान मालवण तर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, सौ.सविता परब, पं.स.मालवण विस्तार अधिकारी सांखिकी श्रीकृष्ण सावंत, कक्षअधिकारी सौ.आदिती धुरी/पुजारे, केंद्रप्रमुख देऊ जंगले, मारुती सोनवडेकर व बिलये उभयता आदी उपस्थित होते. यावेळी सौ. बिलये यांची साडी, श्रीफळाने ओटी भरण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत श्री.बिलये यांना सन्मानचिन्ह,गणेशमुर्ती, शाल व श्रीफळ देऊन मालवण तालुकाध्यक्ष गुरुनाथ ताम्हणकर, शिक्षक शिवराज सावंत,अमर वाघमारे, राजेश भिरवंडेकर, प्रमोद गोसावी, सौ.मयुरी करलकर, रंगराव वडर, राजेंद्र परब यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर शिक्षक समिती मार्फत श्री.बिलये यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष नितिन कदम व तालुकाध्यक्ष सुयोग धामापुरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शिक्षण विभाग मालवणचे विजय अटक, मंगेश गोसावी, सौ.श्रुती कोरगांवकर मँडम, सौ.तेजश्री जोशी, भक्ती पराडकर, संतोषी राऊत, मिनाक्षी गोडगे, लाजरी घाडी, सर्व शिक्षा अभियान मालवणचे वैभव वाघाटे, सौ.आरती कांबळी/वायंगणकर, सौ.गौरी नार्वेकर, स्वप्निल पाटणे, हनुमंत तावडे, नितिन पाटिल, महेश चव्हाण, भाऊराव गायकवाड, रविंद्र बिलये, रघुवीर मयेकर, सौ.अपेक्षा बिलये, कु.रिद्धी व सिद्धी बिलये आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

You cannot copy content of this page