मोदी सरकारचा काँग्रेस बैठकीत निषेध

सोनिया गांधी यांना इडी नोटीस पाठविल्याने काँग्रेस आक्रमक;युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची माहिती

देवगड ता.०२-: काँग्रेस पक्षाच्या नेत्या,सोनिया गांधी,आणि नेते राहुल गांधी यांना ईडीचा धाक दाखवून नोटिसा बजाविण्यात आल्या.अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस व देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने गुरुवारी पार पडलेल्या तालुका कार्यकारणीत करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,सचिव सजाउद्दीन सोलकर,शहर अध्यक्ष उमेश कुळकर्णी उपस्थित होते. या पुढे बोलताना श्री टेंबुलकर म्हणाले,केंद्रातील मोदी सरकारला राहुल गांधी लोकशाहीच्या मार्गाने धारेवर धरत आहेत. केंद्र सरकार ईडी व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीवर ईडीची चौकशी लावण्याचे काम करीत आहे.भाजप खासदार अथवा आमदार याचेवर ईडीची कारवाई होत नाहीत तसेच या पूर्वी भाजप मध्ये नसलेलेवर ईडी ची कारवाई होणार असे समजताच त्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांची ईडीची चौकशी थांबली .

या गोष्टीचाही आम्ही निषेध करतो.असेही टेंबुलकर म्हणाले. राहुल गांधी कोणासमोर न झुकता,न मोडता, न वाकता सक्षमपणे तोंड देतील .त्यांचंबरोबर यापुढील काळात वरीष्ठ नेत्यांकडून ज्याप्रमाणे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page