कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील वरवडे येथील सायकलपटू नितांत ऋजुता राजन चव्हाण याचा रोटरी क्लब कणकवली सेंट्रल च्या वतीने रोटरीयन प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते हॉटेल निलम्स कंट्रीसाईड्स येथे सत्कार करण्यात आला. कणकवली येथील कनक रायडर्स चा सदस्य असलेल्या 16 वर्षीय नितांत याने हिरवे जगू ..हिरवे जपू हा नारा देत निसर्गसंवर्धनाचा संदेश प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने 1 हजार 100 किमी.सोलो सायकल राईड पूर्ण केली होती. 1 मे ते 14 मे 2022 दरम्यान 14 दिवसांत कणकवली चिपळूण मुंबई आणि मुंबई पुणे कोल्हापूर कणकवली या मार्गावर हा सायकल प्रवास नितांत ने यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.
नितांत च्या या धाडसी सायकल प्रवासाची दखल घेत रोटरी क्लब कणकवली ने त्याचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या सचिव वर्षा बांदेकर, रोटरीयन दीपक बेलवलकर, महेंद्रकुमार मूरकर, शशिकांत चव्हाण, दादा कुडतरकर, जगदीश राणे, बहिराम राठोड, डि. आर. आर. विशाखा पेडणेकर, अनिकेत जाधव, डि. झेड. आर, निहाल नाईक, राजेश कदम आदी उपस्थित होते.
