सौ. अनुष्का कदम यांना गुरू गौरव पुरस्कार प्रदान

मालवण ता.०२-:* बिळवस माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात येणारा गुरू गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बीड येथे प्रदान करण्यात आला. सौ. कदम या दरवर्षी नवोपक्रम कृती संशोधन आदी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात.

जिल्हास्तरावर इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. या सर्वांची दखल उस्मानाबाद येथील संस्थेने घेतली. बीड येथील कार्यक्रमात सौ. अनुष्का नागेश कदम यांना शाल, श्रीफळ, महावस्त्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गुरू गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे, सचिव गणेश नागरगोजे, बीड जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब ढाकणे, प्रा. हनुमंत भोसले, गटशिक्षणाधिकारी मन्नूसिंग परदेशी, गणेश घुले आदी उपस्थित होते. सौ. कदम यांचे बिळवस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत ठाकुर, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सचिव अशोक पालव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page