१६ वर्षाखालील मला – मुलींसाठी जिल्हास्तरीय आयोजन
ओरोस ता २-: सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने श्री चेस अकादमी कणकवली आणि सुयोग चेस अकादमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय १६ वर्षाखालील मुला मुलींसाठी बुद्धिबळ स्पर्धा २०२२ रविवार दि ५ जून रोजी ओरोस फाटा येथील श्री इच्छा गोविंद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुक स्पर्धकांनी ९४२२३८१९४९, ९४२०२६०७४४, ९४०४३९६२१६ या नंबरवर ४ जून पर्यंत एसएमएस करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय ७५० रुपये, तृतीय ५०० रुपये व तिन्ही स्पर्धकांना चषक तसेच क्रमांक चार ते दहा असे विजेते काढले जाणार असून बक्षिसे व मेडल देण्यात येणार आहेत.
