सावंतवाडी ता.०२-*:येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगांवच्या सन १९९२ दहावी आणि १९९४ बारावी (शास्त्र) शाखेतील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा बुधवार दिनांक १ जून रोजी काकतकर मंगल कार्यालय, आजगांव येथे उत्साहात संपन्न झाला.
या स्नेहमेळाव्याला मुंबई गोवा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्ज्वलाने झाली. तद्नंतर शाळेच्या माजी शिक्षिका कै.वीणा माईणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्रशालेचे माजी विद्यार्थी दिनानाथ काळोजी, संतोष गवस, तसेच वाघाटे राजेश आजगांवकर यांनी उपस्थित वर्गमित्रांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक राखी आजगांवकर यांनी केले. यावेळी सर्व उपस्थित वर्गमित्रांनी मनोगत व्यक्त करत आपल्या शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा दिला. आपल्या काळातील शिक्षकांनी लावलेल्या कडक शिस्तीचा फायदा आपल्या सर्वाच्या जीवनात नक्कीच झाला व आपल्या जीवना यशस्वी होण्यास मदत झाली असे मत सीमा साटेलकर यांनी व्यक्त केले.
त्यानंतर माजी पंचायत समितीच्या सदस्या मनीषा गोवेकर यांनी आपल्या वतीने सर्वर्गमित्रांना मैत्रीचे प्रतीक म्हणून सुपारीचे रोपटे भेट दिले. तसेच पशुपक्षी व इतर सजीव यांच्या वसाहतीसाठी झाडे लावणे गरजेचे आहे व आपण ते आपले कर्तव्य म्हणून बजावले पाहीजे. निसर्गाचे रक्षण केले पाहीजे हा संदेशही मनीषा गोवेकर यांनी सर्वांना दिला. सदर स्नेहमेळाव्यास संतोष गवस, दिनानाथ काळोजी, राखी आजगांवकर, प्रविण केरकर, राजेश आजगांवकर, श्री.वाघाटे, अर्जुन कापडी, समीर पेडणेकर, महेश झाट्ये, मंगल कानजी, नयन रेवाडकर, कुसुम पांढरे, अर्चना आरोस्कर, मनीषा केदार, सीमा साटेलकर, शितल मेस्त्री, मनीषा गोवेकर, रुपेश पालयेकर, मदन मूरकर, बाबू मेस्त्री, ज्ञानेश्वर नाणोसकर आदी वर्गमित्र सदस्य उपस्थित होते. कार्यकम यशस्वी केल्याबद्दल दीना काळोजी, संतोष गवस, आणि मनीषा गोवेकर यांचे सर्वांनी आभार मानले .
