शहर विकासात राजकारण करणार नाही

राष्ट्रवादी नेते नंदकुमार घाटे ;राष्ट्रवादी कार्यालयात साजरा करण्यात आला वाढदिवस

देवगड, दि.१ जून देवगड जामसंडे शहराच्या विकासासाठी कधीही राजकारण केलेले नाही आणि यापुढेही सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास कसा होईल,देवगड जामसंडे शहराचे नाव सर्वदूर पोहचेल, यासाठी प्रयत्न करणार असून स्थानिक पातळीवर सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी देवगड येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात आपल्या वाढदिवसानिमित्त बोलताना केले यावेळी केक कापून मान्यवर संस्था चेअरमन,संचालक,पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार अजित गोगटे,देवगड अर्बन बँक चेअरमन,दिलीप तथा भाई आचरेकर,देवदुर्ग चेअरमन चंद्रकांत पाळेकर,देवगड शहर विकास अध्यक्ष निशिकांत साटम ,राष्ट्रवादी नेते अबीद नाईक,सावळाराम अनावकर ,उपनगराध्यक्षा मिताली सावंत,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, माजी चेअरमन निलेश पेडणेकर,पदाधिकारी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक स्तरातून शुभेच्छांचा करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग महासंघाचे कार्याध्यक्ष हेमंत करगुटकर, सदस्य प्रदीप मुणगेकर, तालुका अधक्ष प्रकाश प्रदीप मुणगेकर, यांनी देखील शुभेच्छा दिल्या. राजकारणापलीकडे आमची मैत्री -माजी आमदार अजित गोगटे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे हे राष्ट्रवादी पक्षाचे काम करत असले तरी आमची मैत्री ही राजकारणापलीकडे असून निवडणुकीपुरते आमचे राजकारण हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून आजही ती मैत्री कायम जपली आहे.

घाटे साहेबांच्या आपुलकीचा फोन आला की आम्हाला काम करायला हत्तीचे बळ येते-नगरसेवक नाईक घाटे साहेबांच्या आपुलकीचा फोन आला की आम्हाला काम करायला हत्तीचे बळ येत असून देवगड तालुक्यात  ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे कार्य ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे आजही तितक्याच आत्मीयतेने करीत असल्याचे कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक अबीद नाईक यांनी सांगितले. कुणकेश्वर विकास सेवा सहकारी सोसायटीवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलवर बहुमताने निवडून आलेल्या चेअरमन मीना बोंडाळे, व्हाईस चेअरमन सुहास नाणेरकर, संचालक शंकर नाणेरकर, शांताराम चव्हाण, संदीप जोईल, रेश्मा गावकर, निलेश पेडणेकर, नागेश आचरेकर, विश्वनाथ तेली, धुळाजी जंगले आदी सदस्यांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page