स्नेहा नार्वेकर हीचा जागतिक विक्रम

बॅक स्विमिंग करीत २० मिनिटात १२ रुबिक क्यूब सोडविले

वेंगुर्ले ता.०१-:* अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत २० मिनिटात तब्बल १२ रुबिक क्यूब प्रकार सोडवण्याचा विश्व विक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानपत्र व मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत विविध २० मिनिटात प्रकारचे १२ प्रकारचे रुबिक क्यूब सोडवण्याचा विक्रम वेंगुर्ला येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. १४ वर्षाखालील वयोगटातील हा विश्वविक्रम करणारी भारतातील ती पहिली किशोरवयीन मुलगी आहे.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया ही संस्था तळागळातील अशा टॅलेंट वर नजर ठेवून असते. याबाबत स्नेहा चा या रेकॉर्डची माहिती मिळताच त्यांनी याची तात्काळ दखल घेतली. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या जलतरण तलावाच्या ठिकाणी प्रमाणपत्र, सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर आणि सुषमा संजय नार्वेकर यांच्या मार्फत हा सन्मान करण्यात आला. यावेळी स्विमिंग प्रशिक्षक दीपक सावंत, सुरेंद्र खामकर , राजेंद्र प्रभू साळगावकर, नारायण बर्वे, अमेय रेडकर, मानसी रेडकर, राहुल कांबळे, तुषार परब, स्नेहा चे आई वडील वडील रंजन नार्वेकर व मानसी नार्वेकर, ध्रुव गवंडळकर, स्मिता शिवलकर आदी उपस्थित होते.

वेंगुर्ले शहरात राहणारी स्नेहा नार्वेकर ही ती एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असून वयाचा चौथ्या वर्षांपासून स्विमिंगचे शिक्षण घेत आहे. या स्विमिंग साठी तिच्या आई वडिलांचे मोठे पाठबळ स्नेहा ला मिळाले आहे. चौकट: आपण अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत हे क्यूब सोडवले आहेत. लहानपणापासून स्विमिंग केल्यामुळे आता समुद्रात पोहताना मला भीती वाटली नाही. मला भविष्यात इंडियन नेव्ही मध्ये जायचे असून या दृष्टीने माझे प्रयत्न असणार आहेत.असे स्नेहा नार्वेकर हिने सांगितले.

स्नेहा ने केलेले हे रेकॉर्ड अतुलनीय आहे. असा हा विश्वविक्रम करणारी ही भारतातील किशोरवयीन गटातील पहिलीच मुलगी आहे. यासाठीच वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया कडून तिचा सन्मान केला आहे. यापुढे अजूनही तिने विश्वविक्रम करेल असे टॅलेंट तिच्यात आहे. अशाच प्रकारच्या तळागळातील विविध टॅलेंटला नेहमीच वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया नेहमीच सन्मान करत असते अशी प्रतिक्रिया सुषमा नार्वेकर यांनी यावेळी दिली.

You cannot copy content of this page