शहाजी नारनवर, आय.डी जळगावकर यांचे काम कौतुकास्पद…

आर एम रामनुजम; मळगावात झाला सेवानिवृत्तपर सत्कार,अनेकांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा…

सावंतवाडी ता.३१-:* सिंधुदुर्ग वनविभागात टिमवर्कमुळे चांगले काम होत आहे, उपवनसंरक्षक शहाजी नारनावर आणि सहाय्यक वनसंरक्षक आय डी जळगावकर यांनी हे करुन दाखविले. आज ते सेवानिवृत्त होत असले तरी सिंधुदुर्गातील त्याचे काम कौतुकास्पद असेच आहे असे गौरवोद्गार मुख्य वनसंरक्षक आर एम रामनुजम यांनी काढले. सिंधुदुर्ग सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर आणि सहाय्यक वनसंरक्षक आय डी जालगावकर हे आज प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले या सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा कर्मचारी वर्गाने सत्कार ठेवून निरोप समारंभ केला.

या दोन्ही अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आर एम रामनुजम, उपवनसंरक्षक शहाजी नारनावर, सहाय्यक वनसंरक्षक आय डी जालगावकर, सामाजिक वनीकरण चे विभागीय अधिकारी सुभाष पुराणिक, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी दीपक शिरोडकर, प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक सर्जेराव सोनवडेकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे,वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, दोडामार्ग वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक श्री रामनुजम म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांनी टिम वर्क केले. त्यामुळे त्यांच्या कामाला यश आले आहे. नारनवर यांनी अभ्यासू आणि जळगावकर यांनी हसतमुख भूमिकेत काम केले. उपवनसंरक्षक शहाजी नारनवर म्हणाले, वन खात्यात काम करताना आनंद आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपवनसंरक्षक म्हणून आल्यानंतर या जिल्ह्याचे वैभव डोळ्यासमोर आले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने मला भुरळ पाडली.

आता मी सेवानिवृत्त होत असलो तरी सिंधुदुर्ग जिल्हा पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याची जाणीव मला झाली असून जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्या सारखा परिसर राज्यात कुठेही नाही, जीवन प्रवास आणि वनखात्याच्या सेवेत अनेक चांगले वाईट प्रसंग आले त्यातून अनुभव घेत काम केले टीम वर्क म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम केल्यामुळे मला अधिकारी आणि कर्मचारी देखील प्रेम दिले. काम हीच माझी ओळख ठरली आहे असे मी मानतो.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आय डी जळगावकर म्हणाले, मी रायगड मधून सामाजिक वनीकरण मध्ये काम केले नंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक वनीकरण आणि वन विभागात काम केले. यात बरेच चांगले वाईट काम अनुभव आले मात्र सिंधुदुर्ग येताना बदली होईल या अपेक्षेने आलो परंतु बदली काही झाली नाही मागील तीन वर्षापासून या ठिकाणी सेवा दिली कुटुंबाने साथ दिल्यामुळे मला इथे राहून सेवा देता आली या वेळी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मला भरभरून सहकार्य दिले.

यावेळी प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक सर्जेराव सोनवडेकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, सामाजिक वनीकरण चे विभागीय वनसंरक्षक सुभाष पुराणिक, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी दीपक शिरोडकर यांनी या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, वनपाल सुनील सावंत,श्रेया परब व कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहाजी नारनावर व आय डी जालगावकर आणि त्यांच्या कुटुंबांचा सत्कार व कौतुक सोहळा याठिकाणी संपन्न झाला. यावेळी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन शिरसागर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानत आपले मनोगतही मांडले.

You cannot copy content of this page