वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व सोशल मिडीयातून प्रसारित झाले. त्याची दखल घेत व पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या वैभववाडी पोलीस ठाण्याचा यशस्वीरीत्या कार्यभार संपुष्टात येत असून ते उद्यापासून वेंगुर्ला येथील पदभार स्वीकारणार आहेत.तसेच वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार अशोक सावंत यांचा सेवानिवृत्ती समारंभ त्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने वैभववाडी पोलीस स्टेशनच्या वतीने वैभववाडी पोलीस स्टेशन येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडीचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, सुरज पाटील, पोलीस नाईक राहुल पवार , जितेंद्र कोलते व अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले , प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तेजस साळुंखे, प्रविणकुमार पाटील, रविंद्र भागवत,यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व सहभागी रक्तदात्यांना पोलीस निरीक्षक अतुल जाधव साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
तर पत्रकार आबा खवणेकर यांचाही यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन पोलिस निरीक्षक अतुल जाधव व चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पडवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, सुरज पाटील, राजेश पडवळ ट्रस्टचे राजेश पडवळ,स्नेहलता चोरगे,कोकणचा तडाखा न्यूज चॅनलचे आबा खवणेकर, मंदार चोरगे, मंगेश चव्हाण तसेच माजी सभापती दिगंबर मांजरेकर, जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, उद्योजक विजय तावडे,व्यापारी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, तालुका शांतता कमिटीचे मारुती मोहिते, पोलीस कर्मचारी मारूती साखरे, अजित पडवळ, गणेश भोवड, राहुल पवार, जिल्हा रुग्णालय रक्तपेढी चे कर्मचारी उपस्थित होते.
