पर्यटन व्यवसायातील अडचणींबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू – दीपक केसरकर

मालवण ता.३१-:* मालवणातील पर्यटन व्यावसायिकांशी माजी राज्यमंत्री व रत्नसिंधु योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी चर्चा केली. यावेळी व्यावसयिकांनी पर्यटन व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. केसरकर यांनी शासन स्तरावरून आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेश परब, नितीन वाळके, दामोदर तोडणकर, रुपेश प्रभू, शाम झाड, महेश हुर्णेकर, महेश कोयंडे, रश्मीन रोगे, रोशन आचरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page