*⚡मालवण ता.३१-:* खालची रेवंडी येथे वडाच्या झाडावरून दगडात पडून जखमी झालेल्या मादी माकडाला स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक उपचार करत जीवदान दिले. यानंतर या माकडास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
खालची रेवंडी येथे वडाच्या झाडावरून दगडात पडल्याने जखमी अवस्थेतील एक मादी माकड ग्रामस्थांना दिसून आले. दुखापतीमुळे माकडाच्या दोन्ही पायांची हालचाल होत नव्हती. यावेळी ग्रामस्थ अमोल वस्त, प्रशांत कांबळी, प्रमोद कांबळी, गजानन कांबळी, कैलास कांबळी, आर्या कांबळी, पुनीत कांबळी यांनी माकडाला वाचवण्याच्या दृष्टीने मदतकार्य सुरू केले.
वन विभागास याबाबत माहिती देण्यात आल्यावर वन विभागाचे अधिकारी अमृत शिंदे, श्री. परीट, वनपाल शरद कांबळे, राहुल मयेकर आदी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमी मादीवर प्राथमिक उपचार करून त्या माकडाला पिंजऱ्यात घालून ताब्यात घेत वन अधिवासात सोडण्यात आले
