कणकवली पंचायत समितीकडून एमआरजीएस च्या कामांना गती

शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याचे यश आल्याचा दावा

कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील एमआरजीएसमधून अनेक गोठयांचे प्रस्ताव प्रलंबित होते. शिवसेनेकडे अनेक शेतकऱ्यानी तक्रारी केलेल्या होत्या. गेली २ वर्षे गोठ्यांचे प्रस्ताव होत नव्हते. या संदर्भात गटविकास अधिकारी (उच्च स्तर वर्ग 1) पंचायत समिती कणकवली यांची माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने ११ मे, २०२२ रोजी भेट घेतली होती.

यावेळी बिडिओ यांनी प्रलंबित गोठ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देतो असे सांगितले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ९३ प्रस्तावांना बिडिओनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे यामध्ये असलदे 6,बीडवाडी 5, डामरे 5,दारिस्ते 1,घोणसरी 2,सांगवे- 3,सातरल- 3,शिरवल – 2,शिवडाव-9 ,हळवल 2, तिवरे 1,तरळे – 1,वरवडे 1,हरकुळ ब्रुदृक- 4 हरकुल खुर्द – 9,कळसुली 4,करंजे 1, करूळ 1,कासरडे 1,कोड्य 2, खारेपाटण 2 कुंभवडे 9, लोरे 3,नागवे 1,नरडवे 1,नाटळ 1, ओसरगांव – 1,फोंडा 7,पिसेकामते 1, साकेडी 3 असे मिळून कणकवली तालुक्यातील 93 गोटे मंजूर झाले आहेत.

You cannot copy content of this page