दशावतारी कलाकारांचा 4 जून रोजी जाहीर मेळावा

कणकवली ता.३१-:* श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे 4 जून रोजी दशावतारी कलाकारांचा जाहीर मेळावा सकाळी 10 वाजता, चैतन्य मंगल कार्यालय, मालवण नेरूर पाररोड,नागदा मारुती मंदिर जवळ कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या वर्षी दशावतारी कलाकारांचा आणि दशावतारी मंडळांचा जाहीर सत्कार करण्यात आला. दशावतार कलाकार जगला तर कला जिवंत राहील. यासाठीदशावतारी कलाकारांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे.

भविष्याचा विचार करून यापुढे दशावतारी कलाकारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली पाहिजे.यासाठी संकल्पना मांडण्यासाठी. दशावतारी नाट्यप्रयोग सादर करताना उद्भवणाऱ्या समस्या उदा.माईक सिस्टीम समस्येमुळे त्यांच्या आवाजावर परिणाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवार ४ जुन २०२२ रोजी सकाळी -१० वाजता, चैतन्य मंगल कार्यालय, मालवण नेरूरपाररोड,नागदा मारुती मंदिर जवळ कुडाळ येथे दशावतारी जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहेतरी सर्व दशावतारी कलाकारांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच तर्फे करण्यात आले आहे .

You cannot copy content of this page