जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांचा विश्वास; पाठपुराव्याला यश आल्याने व्यक्त केले समाधान…
सावंतवाडी ता.३१-:* शासनाने सावंतवाडी तालुक्यासाठी मृद व जलसंधारण उपविभागाचे स्वतंत्र निर्मिती केली आहे त्याबाबतचा अध्यादेश नुकताच पारित करण्यात आला आल्याची माहिती माजी पंचायत समिती सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी आज येथे दिली. शासनाकडे गेली चार वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून या विभागाशी निगडीत विकास कामांना आता चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री मडगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहीती दिली. ते म्हणाले सावंतवाडी तालुक्याला स्वतंत्र मृदू व जलसंधारण विभागाची आवश्यकता होते हा विभाग सावंतवाडीला नसल्याने येथील
