मोफत आधार अभियानाचा १५०० जणांनी घेतला लाभ

अर्चना फाऊंडेशनचे आयोजन;अर्चना घारे – परब यांनी मानले आभार

सावंतवाडी ता.३१-:* अर्चना फाऊंडेशन यांच्याकडून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आधार अभियान २०२२ या उपक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ९ दिवस सुरू असलेल्या या उपक्रमाचा सुमारे १५०० नागरिकांनी लाभ घेतला आहे.

या उपक्रमाचे अर्चना घारे परब यांनी यशस्वी आयोजन केले असून, सर्वच लाभ घेतलेल्या नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदयातुल्लाह खान, चित्रा देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page