बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनीतून आता रिझल्ट अपेक्षित

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे मत

सावंतवाडी ता.३१-:* सावंतवाडी नगरपालिकेने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी मधून आता रिझल्ट दिसायला हवेत असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. एडमिशन या हर्ष साबळे यांच्या संस्थेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी चालविली जात असून, यासाठी साबळे यांनी सी एस आर फंड ही उपलब्ध करून दिला आहे.

या संस्था चालकांनी सखोल अभ्यास करून यू पी एस सी मध्ये रिझल्ड दाखवावेत. आज यू पी एस सी मध्ये मराठी मनाचा टक्का वाढला असून, ही अभिमानाची बाब आहे. आज उत्तीर्ण झालेल्या तसेच सर्वच विद्यार्थ्यांचे आपण मनापासून अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page