अखेर दांडेली आरोस बाजारामध्ये गटार, पाईपचे काम पूर्णत्वास

बांदा ता.२९-:* दांडेली-आरोस बाजार येथे पाईपलाईन खोदाईमुळे ग्रामस्थांच्या घरात माती व पाणी घुसून नुकसानास सामोरे जावे लागत होते. दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर यांनी सतत केलेला पाठपुरावा आणि ग्रामस्थ संदीप माणगावकर यांनी दिलेल्या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेत शुक्रवारी रात्री गटार खोदाई करत पाणी जाण्यासाठी पाईप टाकल्याने आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. आरोस बाजारमध्ये खोदाई करण्यात आलेल्या पाईपलाईनची माती ग्रामस्थ संदीप माणगावकर यांच्या घरात घुसली होती. तसेच बाजारपेठेतील अन्य दुकानातही काही प्रमाणात पाणी शिरले.

पाण्याला जाण्यासाठी मोरी पूल व गटार आवश्यक असल्याची बाब सरपंच कृष्णा पालयेकर व ग्रामस्थ संदीप माणगावकर यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तरीही दखल न घेतल्याने अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी दोन दिवसांत कार्यवाही न केल्यास कार्यालयातच तळ ठोकणार असल्याचा इशारा ग्रामस्थ संदीप माणगावकर यांनी दिला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने गटार खोदाई करून पाईप टाकल्याने ग्रामस्थान मधून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page