कणकवलीत २ जून रोजी ग्राहक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

कणकवली ता.२९-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आयोजित एक दिवसीय विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा गुरुवार दिनांक २ जून २०२२ रोजी कणकवली येथील हॉटेल महाराजा येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रबोधन कार्यशाळा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यात सर्जेराव जाधव गुरुजी (राज्य संघटक, ग्राहक पंचायत महाराष्ट्र), रमेश पवार (तहसिलदार, कणकवली), अरुण वाघमारे (राज्य सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र), समीर नलावडे (नगराध्यक्ष, कणकवली), वैशाली राजमाने (उपविभागीय अधिकारी (महसुल), राजेंद्र हुलावले (पोलीस निरीक्षक, कणकवली) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रबोधन लाभणार आहे. यात मार्गदर्शक अरुण वाघमारे हे ‘संस्थेची तत्वप्रणाली आणि संस्थेचा कार्यकर्ता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दादासाहेब गीते (जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग) हे ‘रास्त धान्य वितरण व्यवस्था’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील. त्यानंतर बाळासाहेब मोहिते (कार्यकारी अभियंता, महावितरण, कणकवली) हे ‘विजवितरण कंपनी आणि ग्राहक’ या ज्वलंत विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सर्जेराव जाधव (राज्य संघटक, ग्राहक पंचायत, महाराष्ट्र) हे ‘शेतकरी ग्राहक’ या विषयावर तर कमलाकांत कुबल (माजी अध्यक्ष, जिल्हा ग्राहक मंच, सिंधुदुर्ग) ‘जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपध्दती’ या विषयावर तर प्रा. एस. एन. पाटील (अध्यक्ष, कोकण विभाग व राज्य सदस्य ग्राहक पंचायत, महाराष्ट्र) हे ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० ते २.०० स्नेहभोजन व दुपारी २.०० ते ३.०० चर्चासत्र संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी ३.०० ते ३.३० अध्यक्षीय भाषण, आणि दुपारी ३.३० ते ४.०० – प्रमाणपत्र वाटप व समारोप होणार आहे. तरी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा व तालुका शाखा कणकवली यांच्यावतीने प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page