किर्लोस – आंबवणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

मालवण ता.२९-:* जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस आंबवणे रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनमधून ५ लाख निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपा विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी स्थानिक भाजपा नेते बाळा लाड यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू परुळेकर, युवा कार्यकर्ते सुशांत घाडीगांवकर, असगणी माजी सरपंच राजेश तांबे, तुषार हाटले, आंबवणेवाडी सेवा मंडळ मुंबईचे खजिनदार शंकर लाड, बुथ अध्यक्ष प्रविण घाडीगांवकर, बाळा घाडीगांवकर, छोटू किर्लोस्कर, शुभम बाक्रे, ग्रा. प. सदस्य भास्कर लाड, व ग्रामस्थ उपस्थित होते.

या रस्त्यासाठी बाळा लाड व प्रविण घाडीगांवकर यांनी सतत केलेल्या पाठपुरावाचे विषेश कौतुक महेंद्र चव्हाण यांनी केले. हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला होता. याबाबत बाळा लाड यांनी लक्ष वेधताच महेंद्र चव्हाण यांनी निधी उपलब्ध दिला. माजी उपसभापती परुळेकर यांनीही वेळोवेळी रस्त्याच्या बाजूला झाडी व खड्डे बजावण्यासाठी कार्यकाळात काम केले, असेही यावेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page