देऊळवाडा येथील ओहोळातील माती व गाळ काढण्याच्या कामास आजपासून सुरुवात…

शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गावकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ…

मालवण दि प्रतिनिधी गेले अनेक दिवस मालवण देऊळवाडा येथील ग्रामस्थांची मागणी असलेल्या मालवण देऊळवाडा येथील ओहोळातील माती व गाळ काढण्याच्या कामास आजपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.या कामाचे शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी केलेल्या या गाळ काढण्याच्या मोहिमेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. गेले काही वर्षे मालवण देऊळवाडा येथील ओहोळात मोठ्या प्रमाणावर माती व कचरा मिश्रित गाळ साचला होता त्यामुळे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मध्ये रस्त्यावर पाणी साचून आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होतो तसेच गणेश चतुर्थीच्यावेळी गणेश विसर्जन करताना अनेक गणपतीचे विसर्जन संपूर्णतः होत नाही. याकडे देऊळवाडा परिसरातील नागरिकांनी तसेच मनसेचे अमित इब्रामपुरकर यांनी दोन महिन्यापूर्वी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे तसेच जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते तर शिवसेनेचे यशवंत गावकर यांनीही जिल्हा प्रशासनाकडे आणि आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते या पार्श्वभूमीवर मालवण न प चे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी येथील गाळ उपसा करण्यासाठी १ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या गाळ उपसा कामास आजपासून प्रारंभ झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, अमित इब्रामपुरकर, नीना मुंबरकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, किसन मांजरेकर, मोहन मराळ, उमेश चव्हाण, गणेश चव्हाण, दशरथ कवटकर, संदीप मालंडकर हे यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page