एक तास स्वच्छतेसाठी..एक तास देशसेवेसाठी
कणकवली ता.२९-:* एक तास स्वच्छतेसाठी..एक तास देशसेवेसाठी या मोहिमेला रविवारी उस्फुर्त प्रतिसाद लाभला रविवारी सकाळी 9 वाजता कणकवली तालुक्यातील करूळ येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेला गावचे सरपंच बबन कर्णिक व करून हायस्कूलचे मुख्याध्यापक नारकर यांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे करुळ गावातील ग्रामस्थ व महिला वर्ग तसेच शिक्षक व विद्यार्थी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. करूळ गावचे सरपंच बबन कर्णिक यांनी सर्व स्वच्छतादूत यांची चहा, नाश्ता, पाणी याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कणकवली तालुक्याचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी स्वतः उपस्थित राहून तब्बल दोन तास स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
त्याशिवाय स्वच्छता दूत पत्रकार रमेश जोगळे व अशोक काका करंबळेकर, गणेश जेठे यांनीदेखील उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला या मोहिमेत कोंडये गावातील मुले व मुलींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे कोंड्ये गावचा स्वच्छता ब्रँड अँबेसिडर रोहित याची उपस्थिती ही लक्षवेधी होती.संपूर्ण परिसर साफसूप व स्वच्छ करण्यात आला.स्मारक परिसरात येणाऱ्या पावसाळ्यात फुलझाडे व फळझाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी तहसीलदार आर.जे. पवार यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तब्बल 60 स्वच्छतादूत यांनी दोन तास काम केले. .
