नगरसेवक शिशिर परुळेकर यांची टीका
कणकवली ता.२९-:* कणकवली रेस्ट हाऊसच्या आंब्याखाली बसून टेंडर मॅनेज करणाऱ्या नगरसेवक कन्हैया पारकर यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर टेंडर च्या अभ्यासाचा आरोप करणे हास्यास्पद आहे. असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.
दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी टेंडर चा झोल झाला असा आरोप केला होता. परंतु, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र नगराध्यक्षानी मारलेला हा खडा कन्हैया पारकर याना परफेक्ट बसला आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
