वेंगुर्ल्यातील भाजपा पदाधिका-यांचा पणजी येथे सन्मान

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* गोवा राज्याच्या निवडणूकीत वेंगुर्ला तालुक्यातील भाजपाच्या पदाधिका-यांनी घेतलेल्या सहभागाबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व गोवा राज्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी त्यांचे कौतुक करुन सन्मान केला.

या सन्मानामध्ये सिधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळू प्रभू व तुळसचे माजी सरपंच विजय रेडकर यांचा समावेश आहे. हा सन्मान पणजी येथील भाजपा प्रदेश कार्यालयात करण्यात आला.

You cannot copy content of this page