तब्बल ३० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या सन १९९१मधील इयत्ता दहावी ‘ड‘च्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा साजरा केला. विशेष म्हणजे पूर्वीच्याच ‘ड‘ वर्गामध्ये बसून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी अश्विन पांगम, विष्णू तानावडे, महेंद्र वेंगुर्लेकर, सचिन साळुंखे, अब्दुल शेख, अमोल आरोस्कर, मनिष परब, सचिन रेगे, राहूल चौधरी, दिगंबर वैद्य, सुरेंद्र पडवळ, शेखर पवार, गंगा गोकाकर, स्वप्ना गावडे, स्मिता साळगांवकर, सुगंधा कुबल आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. पाटकर हायस्कूलला भेट दिल्यानंतर उभादांडा सॅम अॅण्ड सन्स रिसॉर्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भविष्यात सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प यावेळी या विद्यार्थ्यांनी केला.

You cannot copy content of this page