देऊळवाडा पुल परिसरातील नागरिकांनी मानले मुख्याधिकारी न.प.प्रशासनाचे आभार
मालवण ता.२९-:* मालवण शहरातील देऊळवाडा येथील ओहोळात साचलेल्या माती व गाळामुळे पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर पाणी साचून आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होतोच शिवाय गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश विसर्जन करताना अडचणी येत असल्याने या ओहोळातील गाळाचा उपसा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देवूळवाडा परिसरातील नागरिकांनी दोन महिन्यापूर्वी मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.संतोष जिरगे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले या निवेदनाचा यशस्वी पाठपुरावा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केल्यानंतर त्याची दखल घेत मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी शुक्रवारी १ लाख रुपये निधी मंजूर केला. गाळ उपसा करण्याचे काम आज रविवारपासून सुरू होणार आहे अशी माहिती मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.
दरम्यान, मालवण नगरपालिका प्रशासनाने केलेल्या या कामगिरीबद्दल देऊळवाडा पुल परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी व न प प्रशासनातील अवेक्षक सुधाकर पाटकर अभियंता सोनाली हळदणकर यांचे आभार मानले असल्याची माहितीही मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.
