वेंगुर्ला ता.२९-:* वेंगुर्ला तालुक्याची उपसरपंच संघटनेची बैठक २८ मे रोजी साई मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपसरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी शैक्षणिक, सामाजिक आणि समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश नाईक यांची, उपाध्यक्षपदी मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकांत घाटे यांची तर सचिवपदी रेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेव राणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी गणपत केळुसकर (उभादांडा), रिमा मेस्त्री (आरवली), सुषमा गोडकर (सागरतीर्थ), श्रीकृष्ण बांदवलकर (दाभोली), हेमांगी तेली (आजगांव) आदी ग्रामपंचायतीचे उपसरपंच उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिका-यांचे उपसरपंच संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
