कणकवली ता.२९-:* जि प पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्चश्रेणी मुख्यध्यापक प्रदीप दत्ताराम श्रावणकर यांची महाराष्ट्र राज्य स्काऊट्स आणि गाईडस मुंबई यांचे आदेशान्वये सिंधुदुर्ग जिल्हा भारत स्काऊटस आणि गाईड्स या जिल्हा संस्थेच्या सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी निवड झाली आहे.
प्रदीप श्रावणकर यांचे जि. प. केंद्रशाळा खारेपाटणला राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कुल म्हणून बहुमान प्राप्त करून देण्यासाठी मोलाचे असे सहकार्य लाभले असून त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र् शासनाच्यावतीने त्यांची जिल्हा सहाय्यक आयुक्त पदी निवड केली आहे.
खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर, माजी अध्यक्षा सौ गौरी शिंदे,उपाध्यक्ष आण्णा तेली,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ आरती कावळे ,पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ कीर्ती शेट्ये यांनी अभिनंदन केले आहे. तर तळेरे प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, खारेपाटण केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल यांनी देखील अभिनंदन केले आहे.
