शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांची खास.अनिल देसाई यांच्याकडे मागणी
*⚡कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्यातील नाटळ मोगरणेवाडी येथील प्रलंबित असलेले धरण लवकरात लवकर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातुन मंजुर करावे अशी मागणी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्याकडे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , दिनेश बोबाटे , शाखाप्रमुख सचिन सावंत , गौरव सावंत, मुन्ना तेली आदीनी केली.
२०१२ साली सर्वे झाल्या नंतर आजतागायत हे धरण मंजुर झाले नाही आणि हे धरण मंजुर झाले तर नाटळ संपुर्ण गाव ओलिताखाली येईल म्हणुन तालुकाप्रमुख म्हणून मी सतत खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री ऊदय सामंत यांच्या कडुन पाठपुरावा करत आहे.
आणि या पाठपुराव्याला अधिक गती मिळावी म्हणुन खासदार अनिल देसाई यांना पत्र देवुन धरणाबद्दल पुर्ण माहीती दिली व अनिल देसाई यांनी आपण स्वतः याचा पाठपुरावा करतो व हे नाटळ गावातील धरण मंजुर करण्यासाठी मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन हा प्रलंबित प्रश्न नक्कीच पुर्ण करू अशी ग्वाही दिली असल्याचे शिवसेना कणकवली तालुक प्रमुख प्रथमेश सावंत यांनी सांगितले.
