कोमसापची जिल्हा कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी मंगेश मसके तर सचिवपदी विठ्ठल कदम यांची निवड,जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कुडाळ ता.२८-:* कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या कार्यकारी मंडळाची सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली.

अध्यक्ष मंगेश मस्के यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मंगेश आत्माराम मस्के (कुडाळ) यांची तर कार्यवाहपदी कवी विठ्ठल कदम (सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून मालवणी कवी रुजारिओ पिंटो (मालवण) यांची तर महिला विभागप्रमुख म्हणून लेखिका वृंदा कांबळी यांची निवड झाली.

जिल्हा कोषाध्यक्षपदी भरत गावडे (सावंतवाडी) यांची निवड झाली तर सदस्यपदी सुरेश ठाकूर (मालवण) डॉ.दीपाली काजरेकर (कुडाळ), प्रभाकर धुरी (दोडामार्ग), प्रकाश तेंडोलकर (दोडामार्ग), ॲड. संतोष सावंत (सावंतवाडी), प्रा.सुभाष गोवेकर (सावंतवाडी) यांची निवड झाली. तसेच जिल्हा ग्रंथालय संघ प्रतिनिधी म्ह्णून कुडाळ येथील अनंत उर्फ आनंद वैद्य यांची तर सामाजिक कार्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई यांची निवड झाली. ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून विजय पालकर, साहित्यिक प्रतिनिधी म्हणून रामचंद्र कुबल यांची तर कायदेशीर सल्लागारपदी ॲड.अमोल सामंत, तर भूषण तेजम व अजित फाटक यांची लेखापरीक्षक म्हणून निवड झाली. कोमसापचे प्रिंट मीडिया प्रतिनिधी म्हणून अजय सावंत, प्रमोद म्हाडगुत यांची निवड झाली तर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी म्हणून निलेश जोशी आणि प्रा. रुपेश पाटील यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक सदस्य म्हणून सदानंद कांबळी, कृष्णा गोविंद मसके, ॲड.अरुण पणदूरकर यांची निवड करण्यात आली. युवाशक्ती प्रतिनिधी म्हणून विवेक परब, वर्षाराणी अभ्यंकर, ॲड. मंदार मसके, सायली राऊळ, श्रीहर्षा टेंगशे, स्नेहा कदम, मंगल नाईक-जोशी व स्वप्ना गोवेकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी विविध संमेलन घेण्यासाठी संमेलनाच्या कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. यात कोमसाप साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीसाठी आनंद वैद्य, डॉ.दीपाली काजरेकर, विजय पालकर, निलेश जोशी, अर्जुन राणे, अजय सावंत, सायली मसके यांची निवड करण्यात आली. तर महिला साहित्य संमेलन या कार्यकारिणीत वृंदा कांबळी, प्रा.प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक- जोशी, डॉ. दीपाली काजरेकर यांची निवड झाली. बालसाहित्य संमेलन कार्यकारणीसाठी कवी विठ्ठल कदम, ॲड.संतोष सावंत, अरुण पणदूरकर, प्रा.रुपेश पाटील, प्रा. सुभाष गोवेकर व भरत गावडे यांची निवड करण्यात आली.युवा साहित्य संमेलन कार्यकारिणीसाठी सुरेश ठाकूर, रुजारिओ पिंटो, रामचंद्र कुबल, विवेक परब, वर्षाराणी अभ्यंकर यांची निवड झाली. कवी संमेलनाच्या कार्यकारिणीसाठी प्रभाकर धुरी, प्रकाश तेंडोलकर, भरत गावडे, अवधूत नाईक, महेश बोवलेकर आदींची निवड झाली. कोमसाप लेखन कार्यशाळेतसाठी आनंद वैद्य, वृंदा कांबळी, सुरेश ठाकूर, ॲड.संतोष सावंत, विठ्ठल कदम, श्रीहर्षा टेंगशे, व स्नेहा कदम यांची निवड करण्यात आली.

यावेळी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चाही घडून आणली गेली यात प्रामुख्याने मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन व मंजुरी, सन २०२२-२०२३ साठी सनदी लेखापाल यांच्या नियुक्तीस मंजुरी देणे, पुढील तीन वर्षासाठी नुतन कार्यकारी मंडळातील पदाधिकारी, सदस्य व समिती प्रमुख यांच्या नियुक्त्यांना मान्यता देणे, पुढील वर्षातील प्रस्तावित कार्यक्रमांना (जिल्हा साहित्य सम्मेलन, जिल्हा महिला साहित्य सम्मेलन, बाल साहित्य सम्मेलन व इतर कार्यक्रम मंजूरी घेणे अशा अनेक बाबींची चर्चा झाली.

यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य ॲड.नकुल पार्सेकर, सावंतवाडी कोमसाप शाखेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सभासदांनी या सभेस उपस्थित राहून सहकार्य केले. उपस्थितांचे आभार जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे यांनी मानले.

You cannot copy content of this page