तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडली बैठक…
देवगड ता.२८-: तालुक्यातील खरीप हंगाम २०२२ करीता खत नियोजन आढावा सभा देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडली.या सभेला सभेस जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर , संचालक गजानन गावडे, विठ्ठल देसाई, जिल्हा बँक अधिकारी श्री लोकेगावकर, संजय घाडी, देवगड खरेदी विक्री संघाचे चेअरमन जयदेव कदम , व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर व देवगड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उपस्थित होते.
या सभेत प्रामुख्याने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेचे खतविषयक धोरण, खत कंपन्यांचे २०२२ साठी खत विक्री धोरण, तसेच वि. का सोसायटी यांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा करणेसंदर्भात सोसायटीला सूचना केल्या. तसेच देवगड तालुक्यातील नवनिर्वाचित विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.. फोटॊ -१)देवगड येथे खरीप हंगाम खत नियोजन सभेत मार्गदर्शन करताना मान्यवर२)सभेस उपस्थित देवगड तालुक्यातील विकास सोसा.अध्यक्ष,उपाध्यक्ष सचिव व अन्य
