शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली माहिती
*⚡कणकवली ता.२८-:* मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे सुरू करण्यात येत असलेल्या टोलनाकावर टोलवसुली करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला सूट देण्यात यावी ही आमची मागणी असून शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने जिल्हाभरात टोलमाफीसाठी सह्यांची व्यापक मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे .महामार्गावर अनेक समस्या कायम आहेत. टोलनाका सुरू करण्यापूर्वी या समस्या निकाली काढणे आवश्यक होते. परंतु महामार्ग प्राधिकरणने या समस्या अद्यापपर्यंत सोडविलेल्या नाहीत .त्यामुळे टोलविरोधात जिल्हावासियांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोणत्याही स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमाफी मिळावी ही आमची मागणी आहे सर्व सिंधुदुर्ग वासियांनी या सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा देवुन उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे.
