*⚡मालवण, ता.२८-:* आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आज सर्जेकोट बंदरात रंगीत तालीम घेण्यात आली. बुडणाऱ्या व्यकींना वाचविण्यासाठी काय करायचे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
या कार्यक्रमात तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, कैलास ढोले, हेमंत पेडणेकर, दिलीप खोत, प्रतीक जाधव, श्री. येरम, बोटचालक स्वप्नील सावजी आदी सहभागी झाले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही रंगीत तालीम घेण्यात आली. यात समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
