*⚡कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकाचे आयोजन रविवार २९ मे रोजी सायंकाळी ६ वा. येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या रंगमंचावर करण्यात आले आहे.
नाटकासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. नाटकाचे दिग्दर्शन अनिरुद्ध वनकर, क्रिएटिव्ह हेड प्रा. संगिता टिपले, प्रकाश योजना शिवप्रसाद गौड यांनी केली असून नाटकात प्रा. डॉ. शेखर डोंगरे, संजिव रामटेके, अरविंद खंदारे, नागसेन गायकवाड, चंद्रकांत तोरणे, दिपाली बडेकर, कल्याणी खोब्रागडे आदी कलाकार आहेत. रसिकांनी नाटकास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
