*⚡मालवण ता.२५-:* राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आयोजित घोषवाक्य, निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यातील विजेत्या स्पर्धकांना मालवण तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात गौरविण्यात आले. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, निवासी नायब तहसीलदार जी. कोकरे, नायब तहसीलदार अनंत मालवणकर, नायब तहसीलदार नागेश शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित, प्राध्यापक पवन बांदेकर व अन्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल ; निबंध स्पर्धा:- इयत्ता ९ वी ते १० वी गट, प्रथम – गौतमी उदय घाडी ( न्यू इंग्लिश स्कुल आचरा) द्वितीय : वैश्विका नागेश कदम (लोटो कन्याशाळा) तृतीय : पलक घनश्याम घाडीगावकर (प्रगत विद्यामंदिर रामगड). इयत्ता ११ वी ते १२ वी गट, प्रथम : मिहिका विजय केनवडेकर (टोपीवाला ज्युनिअर कॉलेज ) द्वितीय : दीपिका ज्ञानेश्वर चव्हाण (न्यू कनिष्ठ महाविद्यालय आचरा) तृतीय : रिया गणेश गिरकर (भंडारी ज्युनिअर कॉलेज). इयत्ता १३ वी १५ वी : प्रथम – पूर्वा हरिश्चंद्र वेंगुर्लेकर (स. का. पाटील महाविद्यालय) द्वितीय : चैताली विजय केळुसकर (स. का. पाटील महाविद्यालय) तृतीय : प्रणिता प्रभुराम गोसावी (स का पाटील महाविद्यालय). चित्रकला स्पर्धा:- ९ वी ते १० वी गट, प्रथम : वनश्री बाबूराव यादव (भंडारी हायस्कूल) द्वितीय : सिया गणेश पेडणेकर (भंडारी हायस्कूल) तृतीय : दत्तराज कृष्णा मालंडकर (देवबाग हायस्कुल), इयत्ता ११ वी ते १२ वी गट- प्रथम : निलेश संतोष चव्हाण (भंडारी कनिष्ठ विद्यालय) द्वितीय : सुयश संतोष कातवणकर (भंडारी कनिष्ठ महाविद्यालय ) तृतीय : भूषण निलेश नाईक (भंडारी कनिष्ठ महाविद्यालय). इयत्ता १३ वी ते १५ वी गट, प्रथम – ममता दत्तउदय वायंगणकर ( स. का. पाटील महाविद्यालय ) द्वितीय : आकाश अनिल तावडे (सका पाटील महाविद्यालय) तृतीय : पूर्वा हरिश्चंद्र वेंगुर्लेकर (सका पाटील महाविद्यालय) घोषवाक्य स्पर्धा – ९ वी ते १० वी गट- प्रथम : गौरी गोविंद खोर्जे (लटो कन्याशाळा ) द्वितीय प्राची सखाराम घाडीगावकर (प्रगत विद्यामंदिर रामगड) तृतीय : वैश्विका नागेश कदम (लटो कन्याशाळा). इयत्ता ११ वी ते १२ वी – प्रथम : पूजा रामदास पाटकर ( भंडारी कनिष्ठ महाविद्यालय ) द्वितीय : उत्कर्षा मनोज चिपकर ( भंडारी कनिष्ठ महाविद्यालय ) तृतीय : महेक शेख (सका पाटील महाविद्यालय), इयत्ता १३ वी ते १५ वी गट- प्रथम : पूर्वा हरिश्चंद्र वेंगुर्लेकर (स का पाटील महाविद्यालय) द्वितीय : सानिका जगदीश वायंगणकर (स का पाटील महाविद्यालय) तृतीय : माधवी लीलाधर तिरोडकर (अध्यापक महाविद्यालय) यांना गौरवण्यात आले.
