वळीवंडे कृषीतंत्र विद्यालयातर्फे उत्तम फोंडेकर यांचा सन्मान

*⚡मालवण ता.२५-:* देवगड वळीवंडे येथील कृषीतंत्र विद्यालय येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात मालवण कुंभारमाठ येथील आंबा बायागतदार उत्तम फोंडेकर यांनी आंबा व काजू पिकाबाबत मार्गदर्शन केले. सेंद्रिय हापूस आंबा उत्पादकतेत लक्षणीय प्रगती साधल्याबद्दल तसेच आंबा उत्पादनात राज्यात दर्जेदार आघाडीचे उत्पादन घेण्याचा पहिला मान मिळविल्याबद्दल उत्तम फोंडेकर यांना विद्यालयातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

देवगड वळीवंडे कृषी विद्यालयात झालेल्या मार्गदर्शन शिबिरात उत्तम फोंडेकर यांनी उपस्थित शेतकरी व बागायतदार यांना आंबा व काजू पिकावरील रोग व त्यावरील उपाय याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विद्यालयाचे प्राचार्य विनायक ठाकूर, कार्याध्यक्ष श्री. सावंत, श्री. कदम यांसह शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.

You cannot copy content of this page