तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन…
मालवण दि प्रतिनिधी जगात भारतीय लोकशाही ही सर्वात बळकट अशी मानली जाते. भारतीय संविधानाने नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावत मतदान केले पाहिजे यासाठी मतदाना बाबत सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले. राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम (२५ जानेवारी) निमित्ताने मालवण तहसीलदार कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात तहसीलदार बोलत होते. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, निवासी नायब तहसीलदार जी. कोकरे, नायब तहसीलदार अनंत मालवणकर, नायब तहसीलदार नागेश शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित, प्राध्यापक पवन बांदेकर व अन्य उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनीही मार्गदर्शन केले.
२०२१-२२ वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचा तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यात पारवाडी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नरेश परब (लिपिक) आचरा ग्रामपंचायत, पोईप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष नाईक (कोतवाल पोईप) तहसीलदार कार्यालय मालवण, कांदळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शीतल परब (पोलीस पाटील) मालवण पोलीस निरीक्षक कार्यालय, आमडोस मतदान केंद्र स्तरीय अधिकारी राजेंद्र गोसावी (सहा. शिक्षक) जिप प्राथमिक शाळा आंमडोस कदमवाडी, मालवण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विनोद वाघमोडे (क. सहायक) सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय मालवण. यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
