*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट नांदगाव यांच्यावतीने दशक्रोशीतील नागरीकांसाठी त्वचारोग , गुप्तरोग , कुष्ठरोग यावर रुग्णांची मोफत तपासणी शिबिर २६ जानेवारी रोजी ११ ते १ पर्यंत यावेळेस नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. यात रुग्णांची तपासणी मोफत होणार असून औषधे मेडीसिन हे प्रत्येक रुग्णाला स्वखर्चाने गरजेनुसार घ्यावी लागेल.
सदर शिबिरासाठी डॉ . शिशिर खोसे पाटील हे तज्ञ डॉक्टर लाभणार आहेत.सदर डॉक्टर हे ससून हॉस्पिटल पुणे येथून एम डी पदवी प्राप्त असून केंद्र शासनाची DNB त्वचारोग तज्ज्ञ पदवी पूर्ण झालेली आहे.यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका येथे नियुक्ती झाल्याने त्वचा रोग तज्ञ डॉक्टर व ते ही एम डी पहील्यांदाच रुजू झाले आहेत.
२६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९ वा.ध्वजारोहन झाल्यानंतर नांदगाव ग्रामपंचायतच्या सभागृहात कुष्ठरोग बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर प्राथमिक आरोग्य नांदगाव येथे शिबिरास सुरुवात होईल.तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरजकर ट्रस्टच्यावतीने ऋषिकेश मोरजकर, भाई मोरये तसेच नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्ता तपसे आणि भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर यांनी केले आहे.
