*⚡कणकवली ता.२५-:* नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, नगरसेवक अबिद नाईक आणि विमा व्यावसायिक मंगेश साळसकर यांचे सत्कार करण्यात आले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, निर्माते, दिग्दर्शक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या ५७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकारअशोक करंबेळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.
यावेळी अशोक करंबेळकर यांनी गौरवोद्गार करताना सांगितले कि “समाजात काही व्यक्ती धर्म, जात, पक्ष भेद न मानता निव्वळ मानवतेच्यादृष्टीने आपल्या व्यवसायातून वेळ काढून समाज सेवा करीत असतात अशी ही दोन व्यक्तीमत्व ती म्हणजे अबिद नाईक आणि मंगेश साळसकर हि वेगवेगळ्या व्यवसायातील माणसे. एक राजकारणी तर दुसरे विमा व्यावसायिक. वेगळा आदर्श जपणाऱ्या व्यक्तीमत्वांचा सत्कार करताना मला आनंद वाटतो.
राजेंद्र पेडणेकर म्हणाले, दोघांचाही निगर्वीपणा व वेळेवर मदतीसाठी धावून जाण्याचा स्वभाव आम्हा सर्व व्यापारी बांधवांना भावतो. उत्तरादाखल अबिद नाईक यांनी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाचे (जुना भाजीपाला मार्केट) नुतनीकरण व आदर्श व्यापारी संकुलन होण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे मान्य केले.यावेळी व्यापारी बांधवांनी शुभेच्छा दिल्या.
