*⚡कणकवली ता.२५-:* युवासेनेची जाणवली विभागाची बैठक नुकतीच संपन्न झाली. जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गावनिहाय आढावा घेतला. व उपस्थित युवासैनिकांना युवासेना बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा शिवसेना व युवासेना जाणवली विभागाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, विभागप्रमुख अरविंद राणे, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, शाखाप्रमुख सत्यवान राणे, युवासेना विभागप्रमुख किरण वर्दम, शाखाप्रमुख दिपक दळवी, कणकवली शहरप्रमुख तेजस राणे, तेजस सावंत, वैभव म्हाडेश्वर, नंदकिशोर प्रभुदेसाई, प्रसन्न म्हाडेश्वर, सुहास गुरव, मयूर तेली, निलेश परब, सचिन आचरेकर, संतोष राणे, अभिषेक गुरव, पार्थ सावंत, प्रतीक सावंत, मानसी राणे-वाळके, सानिका राणे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक भालचंद्र दळवी यांनी केले, आभार किरण वर्दम यांनी मानले.
