मनसेचे 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन स्थगित

उपविभागीय अधिकारी यांच्याशी केलेली चर्चा सफल:दया मेस्त्री यांनी दिली माहिती

*⚡कणकवली ता.२५-:* अनधिकृतरित्या होत असलेल्या सिलिका वाळू, खाडी, नदीची वाळू उत्खनन, वाहतुकी बाबत 24 जानेवारी 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबत कारवाई न दिसल्यास कारवाई न करणाऱ्या आपल्या प्रत्येकाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची तंबी देऊन. योग्य प्रकारे चर्चा घडवून आणली. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 26 जानेवारी 2022 रोजी करीत असलेल आंदोलन स्थगित करीत आहे.अशी माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिली.

अनधिकृतरित्या होत असलेल्या सिलिका वाळू, खाडी, नदीची वाळू उत्खनन, वाहतुकी बाबत अनेकदा उपविभागीय अधिकाऱ्यांशी करण्यात आली. तहसीलदार कणकवली यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. मात्र संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नाही. त्या अनुषंगाने दिनांक 24/11/2021 रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत घेण्यात आला. माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्याचे ठरले. त्यानुसार 24/ 11/2021 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यांनी केलेल्या चर्चेनुसार ते दिलेला लेखी पत्रानुसार आंदोलन देखील स्थगित करण्यात आले.

कासार्डे,पियाळी, लोरे, अचिरणे या गावांमध्ये होत असलेल्या सिलिका माईन्स,वाळू उत्खनन, अनधिकृत वाहतूक मात्र थांबलेली नाही. दिखाव्या पूरती नाममात्र कारवाई, फक्त कागदावरील कारवाई करण्यात आली. संबंधित प्रशासनाच्या संशयास्पद कारभारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलनाचे अस्त्र वापरण्याचा मी ठरविले. दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी पुन्हा एकदा 26 जानेवारी 2022. रोजी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दिन 15 जानेवारी 2022 पूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा चर्चा घडवून आणण्याची व केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविण्यात यावी. अन्यथा पुन्हा एकदा 26 जानेवारी 2022 या भारताच्या प्रजासत्ताक दिनी हे आंदोलन करणार असल्याचे पत्र माननीय उपविभागीय अधिकारी कणकवली तहसीलदार कणकवली यांना देण्यात आले होते.

You cannot copy content of this page