यु.डी.आय कार्ड आणि अपंग प्रमाणपत्र वितरण;जयपूर फूट, हॅण्डस मोजमाप शिबीर
*⚡कणकवली ता.२५-:* ट्रेझरर रवींद्र मुसळे आणि संदीप परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोपुरी आश्रम येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींचा मेळावा 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे . याच दिवशी दिव्यांग व्यक्तींसाठी यू डी . आय . कार्ड वितरण आणि ऑन लाईन अपंग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांचेमार्फत वितरित करण्यात येणार आहे . त्याचबरोबर रोटरी क्लब कणकवली आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी जयपूर फूट जयपूर हॅण्डस देण्यासाठी मोजमाप शिबीराचे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती रोटरी क्लबचे प्रेसिडेन्ट डॉ . विदयाधर तायशेटे आणि सेक्रेटरी वर्षा बांदेकर यांनी दिली आहे . रोटरी क्लब कणकवलीचे विदयमान ट्रेझरर रवींद्र मुसळे आणि संविता आश्रम अणावचे संस्थापक संदीप परब यांचा वाढदिवस 1 फेब्रुवारी 2022 रोजी गोपुरी आश्रम , वागदे येथे साजरा करण्यात येणार आहे असे रोटरी क्लब कणकवलीचे प्रेसिडेन्ट डॉ . विदयाधर तायशेटे , ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर आणि एकता दिव्यांग विकास संस्था तालुका कणकवलीचे कार्यकर्ते सुनिल सावंत , आदेश कारेकर दिपक दळवी , दिपक बोभाटे , विजय ओटवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे .
दिव्यांगांपैकी अंध व्यक्तींना पांढरी काठीही देण्यात येणार आहे सदर दिव्यांग मेळाव्यामध्ये दिव्यांगांना विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून रोटरी क्लबच्या माध्यमातून यापूर्वी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेमध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात येणार आहे . तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि वनभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे . ही संकल्पना साकार होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांनी सक्रीय सहकार्य करण्याचे मान्य करून जवाबदारी स्विकारली आहे . गरजू दिव्यांग व्यक्तींनी जयपुर फूट जयपूर हॅण्डस मोजमाप शिबीरासाठी व अधिक माहितीसाठी दादा कुडतरकर , ईव्हेन्ट चेअरमन , मोबाईल नंबर 9422379090 आणि डॉ . सुहास पावसकर मोबाईल नंबर 9422373533 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करणेत आले आहे .
