सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांना यश; संजय पेडणेकर आणि रवी जाधव यांची माहिती
सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरातील खराब रस्त्यामुळे सिजर झालेल्या महिलांना असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे तो रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. या कामासाठी साडे सात लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून, सबंधित काम त्वरित सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी कडून २६ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेले उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी चे सदस्य माजी नगरसेवक संजय पेडणेकर आणि सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे.
