करुळ व भुईबावडा घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजप युवा मोर्चाचा रास्ता रोको…

वैभववाडी प्रतिनिधी नादुरुस्त करुळ व भुईबावडा घाटरस्त्यामुळे ऊसतोडणी रखडली आहे. घाटमार्ग दुरुस्तीबाबत तालुक्यात दोन ठिकाणी भाजपा किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यानी रास्ता रोको आंदोलन केले. शहरात संभाजी चौक येथे तळेरे-कोल्हापुर महामार्ग वैभववाडीत दीड तास तर उंबर्डे कँन्टींगजवळ खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्ग चार तास रोखुन धरला. संतप्त कार्यकर्त्यानी महामार्ग प्रधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावून काढले.

निष्क्रिय अधिका-यांचा आंदलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार, पालकमंत्री यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान 28 जानेवारीपासुन करूळ घाटरस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. तर भुईबावडा घाटरस्त्याने येत्या आठ दिवसांत वाहतुक सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही ठिकाणच आंदोलन स्थगित करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनामुळे दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. तालुक्यातील नादुरूस्त करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांमुळे भाजपा आक्रमक झाली. या रस्त्यांमुळे जिल्हयातील ऊसतोडणी रखडली आहे. 1लाख टन ऊसापैकी अवघ्या पाच ते सहा हजार टन ऊसाची तोडणी झाली आहे. उर्वरित ऊसाची तोडणी न झाल्यास मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्यावतीने आज तळेरे-कोल्हापुर महामार्गावरील वैभववाडी येथे रस्ता रोखण्यात आला.

तर खारेपाटण-उंबर्डे येथे देखील त्याचवेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वैभववाडी येथील आंदोलनात भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, मनोज रावराणे, अक्षता डाफळे, राजेश माळवदे, सुधीर नकाशे, दिगबंर मांजरेकर, संतोष कानडे, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष महेश संसारे, संजय सावंत, राजु पवार, रत्नाकर कदम, अनिल पेडणेकर, राजन तांबे, शुभांगी पवार, सुप्रिया तांबे, पुंडलिंक पाटील, सज्जन रावराणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. या रस्त्यावरून मोठी वाहतुक असल्यामुळे तळेरे-कोल्हापुर महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दोन तीन किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर पोलीसांचा मोठा फौजफाटा तेथे जमा झाला. भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलन सुरू झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणचे उपअभियंता आत्माराम ओटवणेकर तेथे आले. त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपा कार्यकर्त्यानी पहिले काम सुरू करा आणि मगच चर्चेला या असे प्रतिउत्तर दिले. दोन, तीन प्रयत्न केल्यानंतर कार्यकर्त्यानी त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. आताच्या आता घाटात काम सुरू व्हायलाच पाहीजे अशी भुमिका त्यांनी मांडली. तास दीड तास वाहतुक खोळंबल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी रस्त्यांच्या दुतर्फा होत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी सुचना केली. त्यानंतर पुन्हा चर्चेला सुरूवात झाली. यावेळी भाजपाचे उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांवर तुटुन पडले. तीन तीनदा आश्वासन देवुन त्याची पुर्तता तुम्ही करीत नाही. घाटरस्त्यांतील केवळ खड्डे बुजविले असते तरी ऊसतोडणी वेळेत होवुन शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान महामार्ग प्रधिकरणने भरून द्यावी अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा आश्वासन देवुन जनतेची फसवणुक केली म्हणुन पोलीसांनी त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कारभाराचे अक्षरक्ष वाभाडे काढले.बराच वेळ चर्चा सुरू होती.अखेर पोलीस निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांना रस्ता रोखता येणार नाही असे सांगीतले. तुम्ही चर्चेने प्रश्न सोडवा असे स्पष्ट केले. त्यानंतर उपअभियंता श्री.ओटवणेकर यांनी 25 जानेवारीला या कामाची निवीदा प्रकिया होवुन 28 जानेवारीपासुन काम सुरू करण्यात येईल. तसे लेखी आश्वासन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी दोन्ही बाजुची वाहतुक सुरळीत केली. दरम्यान खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे येथे रस्ता रोखुन धरला होता. याठिकाणी देखील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. येथे देखील कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. भुईबावडा घाटात कोसळलेल्या ठिकाणची दुरूस्ती करून वाहतुक सुरू करावी अशी कार्यकर्त्याची मागणी होती. येथे पदाधिकाऱ्यांनी चर्चा करण्यासाठी बांधकाम विभागाचे उपविभ

You cannot copy content of this page