आमदार दीपक केसरकर यांच्या नाव न घेता संजू परब यांना टोला
*⚡सावंतवाडी ता.२४-:* महिलांना सक्षम करण्यासाठी भविष्यात आमदारकीसाठी सावंतवाडी तालुक्यात एक महिला उमेदवार देणार असल्याचे मी सांगितले होते. मी माझ्या घरातील महिला उभी करणार असे कधीच सांगितले नाही. सर्वसामान्य घरातील देखील ती महिला असू शकते. परंतु, कदाचित आमदारकीची स्वप्न पाहणारे संजू परब यांना भीती वाटली असेल म्हणून त्यांनी आजचे वक्तव्य केले असा टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांना लगावला आहे.
