सावंतवाडी ता.२४ क्रीडा संकुल हे तालुक्याच्या ठिकाणी असावे लागते हे संकुल बांद्यात कधीही मंजूर झाले नसुन मी बांदा आणि सावंतवाडी असा फरक कधीही केलेला नाही तालुका क्रीडा संकुलाला एक कोटी रुपये मिळाले असून सावंतवाडीला हा एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे यामुळे स्वतःच्या स्वार्थापोटी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य मी केलेले नाही बांद्यात होऊ नये असा गैरसमज पसरायचा काहींचा डाव आहे असा पलटवार दीपक केसरकर यांनी पंचायत समिती उपसभापती यांनी केलेल्या वक्तव्याचा केला आहे
क्रीडा संकुल हे बांद्याला कधीच मंजूर झाले नाही… गैरसमज पसरवण्याचा काहींचा डाव; आमदार दीपक केसरकर यांचा पलटवार
