प्रजास्ताक दिनानिमित्त पालिकेकडून जलतरण सफरचे आयोजन…

*⚡सावंतवाडी.२४-:* नगरपरिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित, तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ माझी वसुंधरा-२ अंतर्गत – पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात जनजागृती करण्यासाठी २६ जानेवारी ‘प्रजासत्ताक दिनी’ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत नगरपरिषदेच्या मोतीतलावातील ‘जलक्रिडा केंद्र’ येथे शहरातील नागरिकांसाठी ‘जलतरण सफर’ चे आयोजन करण्यात आले आहे. 

   कोविड-१९चे दोन डोस घेतलेल्या शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावयाचे असून दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. या सफारीत कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणण्यास मनाई आहे. नगरपरिषदेच्या कारिवडे येथील घनकचरा प्रकल्प केंद्रास भेट देऊन घनकचरा प्रक्रियेबाबत माहिती घ्यावयाची आहे. नागरिकांसाठी हे प्रकल्प केंद्र खुले ठेवण्यात आले आहे. तरी या ‘जलक्रिडा सफर’ मध्ये शहरातील बहुसंख्य नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन सहभागी व्हावे असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्यअधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page