चांदीच्या गणेशमूर्तीसह चांदीचे चार शिक्के आणि तीन फोटो लंपास
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आंबेरी तेलीवाडी येथील अशोक जनार्दन आंबेरकर यांच्या घराची कडी तोडून चांदीची गणपतीची मुर्ती, गणपती व सरस्वतीचे चांदीचे चार शिक्के, तीन फोटो असा एकूण २६५० रूपयाचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अशोक आंबेरकर याने दिलेल्या तक्रारीनुसार वासुदेव तुकाराम आंबेरकर व मुकुंद वासुदेव आंबेरकर या दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण हे अधिक तपास करीत आहेत.
